नगर – राज्यात होत असलेल्या राजकीय घडामोडीमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. भाजपने दूरदृष्टीने निर्णय घेतले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचलित होवू नये. खचून न जाता एकनिष्ठेने पक्षाचे कामे चालूच ठेवा. कितीही राजकीय उलथापालथी झाल्या तरी नगरचा आमदार हा निष्ठावंत भाजपचाच होईल, अशी आशा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी व्यक्त केले.
गंधे यांनी ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात आरती केली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी महेंद्र गंधे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र गांधी, माजी उपमहापौर मालन ढोणे, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, बाबासाहेब सानप, प्रदीप परदेशी, अजय चितळे, श्रीगोपाल जोशी आदी उपस्थित होते.
अभय आगरकर म्हणाले, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाचे व देशाचे हित पाहून योग्य निर्णय घेतले असतील. प्रत्येक पक्षात संक्रमण काल येतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळून जाऊ नये. महेंद्र गंधे, विवेक नाईक, संतोष गांधी, उदय अनभुले यांचे चांगले काम चालू आहे