मोठी बातमी : पुण्यात पोलीस आणि स्थानिकांमध्ये तुफान राडा; नागरिकांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Updated On:
मोठी बातमी : पुण्यात पोलीस आणि स्थानिकांमध्ये तुफान राडा; नागरिकांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे – शहरातील दांडेकर पुलाजवळील अंबिल ओढा वसाहत सर्व्हे नंबर 133 ही पालिका घोषित झोपडपट्टी पाडण्यासाठी पोलिस दाखल झाले आहेत. यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. पालिका आणि पोलीस प्रशासन बळाचा वापर करून नागरिकांना नाहक त्रास देत असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. ही कारवाई सकाळी आठ वाजता सुरू झाली आहे, त्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना पोलीस धरपकड करत आहेत.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/487479855842751

आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोहोचले असता यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिस्थिती चिघळली आहे. पालिका मात्र कारवाईवर ठाम असून एका पाठोपाठ एक जेसीबी इथे पाठवले जात आहेत.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/1069009816841060

पावसाळा सुरु असताना महापालिकेने जेसीबीच्या मदतीने हे अतिक्रमण सुरु केल्यानं स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. पाच ते सहा जेसीबींच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात येत असून या भागातील घरांतून नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढलं आहे.

आंबिल ओढा परिसरातील हा प्लॉट पुणे महापालिकेच्या मालकीचा असून इथल्या रहिवाशांना केदार बिल्डर्सकडून अतिक्रमणाची नोटिस पाठवल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ही महापालिकेची जागा असली तरी महापालिकेकडून कोणतीही नोटिस आली नसल्याचं नागरिकांनी सांगितले आहे. या परिसरातील लोक गेली पन्नास वर्षे इथे राहत असून त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रयत्न न करता महापालिकेकडून ही कारवाई केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune : पालखी आगमनापूर्वी बुधवार चौकात ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

2026-07-10 14:41:43

Pune : पालखी आगमनापूर्वी बुधवार चौकात ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

Moshi Building Collapse: जेवायला बसलोय.... पत्नीला पाठवलेला संदेश ठरला अखेरचा; एका उमलत्या संसाराचा करुण अंत!

2026-07-10 08:26:21

Moshi Building Collapse: जेवायला बसलोय.... पत्नीला पाठवलेला संदेश ठरला अखेरचा; एका उमलत्या संसाराचा करुण अंत!

Pune News : पोलीस मित्र संघटनेतर्फे पालख्यांचे स्वागत

2026-07-09 21:29:40

Pune News : पोलीस मित्र संघटनेतर्फे पालख्यांचे स्वागत

Khadakwasala Dam : खडकवासला धरणाचा विसर्ग बंद; चारही धरणांमध्ये 16.17 टीएमसी पाणीसाठा

2026-07-09 18:00:22

Khadakwasala Dam : खडकवासला धरणाचा विसर्ग बंद; चारही धरणांमध्ये 16.17 टीएमसी पाणीसाठा

Pune News : रक्षकच बनले भक्षक ! पर्यटकांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या खंडाळा हायवे पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश

2026-07-09 16:48:22

Pune News : रक्षकच बनले भक्षक ! पर्यटकांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या खंडाळा हायवे पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश