Pune : पालखी आगमनापूर्वी बुधवार चौकात ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
Pune : उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरू असतानाच प्राणज्योत मालवली

Pune : बुधवार चौक परिसरात गुरुवारी सायंकाळी श्वसनाचा तीव्र त्रास होऊन ६१ वर्षीय ज्येष्ठ अचानक खाली कोसळले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
उमाकांत भालेराव (वय ६१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भालेराव यांना पूर्वीपासूनच दमा आणि श्वसनाचा विकार होता. गुरुवारी सायंकाळी अचानक प्रकृती खालावल्याने ते जमिनीवर कोसळले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या फरासखाना पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे बुधवार चौकात आगमन होण्याच्या अवघ्या काही मिनिटे आधी ही घटना घडली.
हेही वाचा:





