Cincinnati Open 2024 : मोनफिल्सकडून पराभूत झाल्यानंतर अल्काराजला संताप अनावार, रागाच्या भरात मैदानातच…, पहा Video…

Cincinnati Open 2024 (Carlos Alcaraz vs Gael Monfils) : चार वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या स्पेनच्या कार्लोस अल्काराझने सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेत फ्रेंचच्या गेल मोनफिल्सकडून पराभूत झाल्यानंतर रॅकेटवर आपला राग काढला आणि रॅकेट अनेक वेळा खाली आपटून थेट तोडूनच टाकले. राऊंड आॅफ 32 मध्ये तीन सेटपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या लढतीत मोनफिल्सने 4-6, 7-6 (7-5), 6-4 असा विजय मिळवला.
दुसऱ्या मानांकित अल्काराझने सामन्यानंतर सांगितले की, “माझ्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात वाईट सामना असल्याचे मला वाटते. मी खरोखरच चांगली तयारी केली होती आणि मला चांगले वाटत होते पण मला अपेक्षेप्रमाणे खेळता आले नाही. मला हा सामना विसरून यूएस ओपनसाठी चांगली कामगिरी करायची आहे.”
The video of Carlos Alcaraz’ racquet smash. 😳
Don’t think I’ve ever seen Carlos this frustrated on the court.
— The Tennis Letter (@TheTennisLetter) August 16, 2024
येत्या 26 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या यूएस ओपनच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. मोनफिल्सचा प्रवासही फार काळ टिकला नाही आणि नंतर शुक्रवारी झालेल्या सामन्यात त्याला होल्गर रुनेकडून 3-6, 6-3, 6-4 असा पराभव पत्करावा लागला. महिला गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा स्विटेकने मार्टा कोस्त्युकवर 6-2, 6-2 असा शानदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
The video of Carlos Alcaraz’ racquet smash. 😳
Don’t think I’ve ever seen Carlos this frustrated on the court.
— The Tennis Letter (@TheTennisLetter) August 16, 2024
आर्यना सबालेन्कानेही एलिना स्विटोलिनाविरुद्ध 7-5,6-2 असा विजय मिळवला पण फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन उपविजेत्या जस्मिन पाओलिनीला मीरा अँड्रीवाकडून 3-6, 6-3, 6-2 असा पराभव पत्करावा लागला. अन्य एका सामन्यात अनास्तासिया पावल्युचेन्कोव्हाने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या झेंग कियानवेनचा 7-5, 6-1 असा पराभव केला.
Davis Cup 2024 : सुमित नागलचे डेव्हिस चषक संघात पुनरागमन तर युकी भांबरीची माघार….
दरम्यान, यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरीत अल्काराजला सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचकडून पराभव पत्करावा लागला होता. अशा प्रकारे जोकोविचने विम्बल्डन 2024 मध्ये अल्काराझकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली होती. जोकोविचने रोमहर्षक लढतीत अल्काराझचा 7-6(3), 7-6(2)असा पराभव केला होता आणि अशाप्रकारे जोकोविचने कारकिर्दीत प्रथमच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते.





