Chinchwad News : चिंचवडमधील अत्याधुनिक ‘ओपन बॅडमिंटन कोर्ट’ सज्ज; पाहा कधी होणार उद्घाटन
Chinchwad News : माजी नगरसेवक राजेंद्र गावडे यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार शंकर जगताप यांच्या निधीतून बॅडमिंटन कोर्टचे काम पूर्ण.

Chinchwad News – चिंचवडमध्ये साकारण्यात आलेल्या खुल्या बॅडमिंटन कोर्टचे काम आता पूर्ण झाले आहे. लवकरच हे कोर्ट नागरिकांच्या सेवेसाठी खुले होणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी दिली. माजी नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी ‘ओपन बॅडमिंटन कोर्ट’साठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, आमदार शंकर जगताप यांच्या निधीतून हे दर्जेदार कोर्ट पूर्ण झाले आहे. या ठिकाणी आधुनिक दर्जाचे कोटिंग आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक तरुणांना आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामासाठी व खेळासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळणार आहे.
बॅडमिंटन कोर्टचे मुख्य काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांत आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या कोर्टचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर हे कोर्ट सर्वसामान्य नागरिकांसाठी खेळण्यासाठी खुले केले जाईल.
“स्थानिक भागातील खेळाडूंना सरावासाठी लांब जावे लागू नये आणि नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा सुधारावा, हा आमचा मुख्य उद्देश आहे. आमदार शंकर जगताप याच्या निधीचा विनियोग करून आम्ही हे कोर्ट पूर्ण केले आहे.”
– राजेंद्र तानाजी गावडे (माजी नगरसेवक)





