Wagholi News : लोहगावमधील बांधकामांवर होणारी अन्यायकारक कारवाई थांबवा! कठोर कारवाईची नगरसेवकांची मागणी
Wagholi News : या विषयावर चर्चा करण्यासाठी प्रभाग क्रमांक १,२,३ चे नगरसेवक रामभाऊ दाभाडे अनिल सातव, ऐश्वर्या पठारे, श्रेयस खांदवे, तसेच सुरेंद्र पठारे, बॉबी टिंगरे उपस्थित होते.

वाघोली : लोहगावमधील बांधकामांवर होणारी अन्यायकारक कारवाई आणि सर्वेक्षण विभागातील कर्मचाऱ्यांकडून होणारी सर्वसामान्य नागरिकांची लूट या गंभीर विषयावर पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन नगरसेवकांनी सविस्तर चर्चा केली. या विषयावर चर्चा करण्यासाठी प्रभाग क्रमांक १,२,३ चे नगरसेवक रामभाऊ दाभाडे अनिल सातव, ऐश्वर्या पठारे, श्रेयस खांदवे, तसेच सुरेंद्र पठारे, बॉबी टिंगरे उपस्थित होते.
आयुक्तांकडे मांडलेले प्रमुख मुद्दे (Wagholi News)
लोहगावचा विकास आराखडा डीपी अंतिम होईपर्यंत कारवाईला स्थगिती द्यावी.
सर्वेक्षणाच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी.
विमाननगर भागातील रूफ-टॉप हॉटेल्स आणि फ्रंट मार्जिनमधील मोठ्या अतिक्रमणांकडे होणारे दुर्लक्ष थांबवून तिथे तातडीने कारवाई करावी.
प्रशासनाने सर्वसामान्यांना टार्गेट करणे थांबवावे, अन्यथा प्रभागातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
रामभाऊ दाभाडे नगरसेवक, पुणे मनपा
हेही वाचा : Strike: राज्यातील १७ लाख शासकीय कर्मचारी, शिक्षक बेमुदत संपावर; नेमक्या काय आहेत मागण्या?





