‘चीनला आमच्याशी चर्चा करायची आहे’ ; टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर ट्रम्पचा मोठा दावा

China US Trade War। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसह जगातील सर्व देश त्यांच्यासोबत व्यापार करारावर वाटाघाटी करू इच्छितात, असा मोठा दावा केला आहे. त्यांनी हे विधान त्यांच्या टॅरिफ पॉलिसी (आयात शुल्क लादण्याचे धोरण) संदर्भात केले. ट्रम्प यांनी याविषयी बोलताना, त्यांनी लादलेल्या टॅरिफचा (रेसिप्रोकल टॅरिफ) परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक देश अमेरिकेसोबत नवीन व्यापार नियम स्थापित करण्यात रस दाखवत आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या या टॅरिफ धोरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे अनेक देशांसोबतचे संबंध प्रभावित झाले आहेत.
ट्रम्प यांनी केला मोठा दावा China US Trade War।
ट्रम्प यांनी इतर देशांविषयी बोलताना, “प्रत्येकजण मला भेटू इच्छितो, अगदी चीनलाही सर्व व्यापार करारावर वाटाघाटी करण्याची इच्छा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. तसेच त्यांनी मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्याशी फोनवर बोलले, जे खूप सकारात्मक होते. याशिवाय त्यांनी जपानमधील उच्च व्यावसायिक अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. या बैठका व्यापार आणि शुल्काशी संबंधित मुद्द्यांवर केंद्रित होत्या. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेली चर्चा खूप फायदेशीर होती. जपानच्या व्यापार प्रतिनिधींसोबतही माझी चांगली भेट झाली. प्रत्येक देश, अगदी चीनलाही, मला भेटायचे आहे.”

ट्रम्प यांनी चीनवर २४५% नवीन कर लादला
ट्रम्प प्रशासनाने चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर २४५% पर्यंत नवीन आयात कर (आयात कर) जाहीर केला आहे. यामुळे अमेरिका आणि चीनमधील तणाव आणखी वाढला आहे. व्हाईट हाऊसने या निर्णयाची माहिती देणारे एक तथ्य पत्रक जारी केले. तथ्य पत्रकानुसार, ७५ हून अधिक देश अमेरिकेसोबत नवीन व्यापार करारांवर वाटाघाटी करत आहेत. या देशांवर अद्याप कोणतेही मोठे शुल्क लादलेले नाही, परंतु चीनने अमेरिकेविरुद्ध प्रत्युत्तरात्मक पावले उचलली आहेत, त्यामुळे त्यावर २४५% पर्यंतचे शुल्क लागू होणार आहे. मात्र, व्हाईट हाऊसने हे शुल्क कोणत्या वस्तूंवर आणि कधी लागू होईल हे अजूनतरी सांगितले नाही. अमेरिकेच्या या निर्णयाला चीननेही विरोध केला आहे.
भारत-अमेरिका व्यापार करार सुरू China US Trade War।
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारासाठी वाटाघाटी करण्याची तयारी सुरू आहे. काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भारतीय अधिकारी या आठवड्यात वॉशिंग्टनला भेट देऊ शकतात. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, वाणिज्य विभागाचे अधिकारी राजेश अग्रवाल या संघाचे नेतृत्व करू शकतात. गेल्या महिन्यात, अमेरिकन अधिकारी ब्रेंडन लिंच यांनी (२५-२९ मार्च) भारताला भेट दिली आणि व्यापाराबद्दल चर्चा केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० दिवसांसाठी हे शुल्क स्थगित केले आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही देशांना या वेळेचा वापर करारासाठी एकमत निर्माण करण्यासाठी करायचा आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर लवकरच व्यापार करार होऊ शकतो.





