Gas Explosion : चीनमध्ये कोळशाच्या खाणीत झालेल्या भीषण गॅस स्फोटाने संपूर्ण जग हादरले आहे. उत्तर चीनमधील शांक्सी प्रांतात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 90 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरुवातीला मृतांचा आकडा 8 असल्याचे सांगितले जात होते, मात्र बचावकार्य सुरू असताना मृतांची संख्या झपाट्याने वाढली. (Gas Explosion) मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी खाणीत अचानक भीषण गॅस स्फोट झाला. त्यावेळी खाणीत एकूण 247 कामगार काम करत होते. दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. (Gas Explosion) बचाव पथकांनी रात्रभर मोहीम राबवत आज सकाळपर्यंत 201 कामगारांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मात्र अजूनही 38 कामगार खाणीत अडकलेले असल्याची माहिती समोर आली आहे. अडकलेल्या काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगितले जात आहे. (Gas Explosion) Gas Explosion : मोठी दुर्घटना..! गॅसच्या स्फोटात 90 कामगारांचा होरपळून मृत्यू, जगात खळबळ या दुर्घटनेनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी बचावकार्य अधिक वेगाने आणि व्यापक प्रमाणात राबवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच जखमींवर तातडीने उपचार करण्यास सांगत, या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शांक्सी हा चीनमधील प्रमुख कोळसा उत्पादक प्रांत मानला जातो. देशातील एकूण कोळसा उत्पादनापैकी जवळपास एक तृतीयांश उत्पादन या भागातून होते. सुमारे 3 कोटी 40 लाख लोकसंख्या असलेल्या या प्रांतात गेल्या वर्षी तब्बल 1.3 अब्ज टन कोळसा उत्पादन झाले होते. (Gas Explosion) गेल्या काही वर्षांत चीनमध्ये खाण सुरक्षेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असली तरी, सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष आणि नियमांची अपुरी अंमलबजावणी यामुळे अशा दुर्घटना अजूनही घडत असल्याची चर्चा आहे. (Gas Explosion)