China Open 2024 : विजेतेपदासाठी कोको-मूचोवा आमने-सामने, थोड्याच वेळात सुरू होणार लढत….

China Open 2024 (Karolína Muchova vs Coco Gauff) :- अमेरिकेच्या कोको गॉफने स्पेनच्या पॉला बाडोसाला तर चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवाने चीनच्या झेंग क्विनवेनला पराभूत करताना चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. हा विजेतेपदाचा सामना थोड्याच वेळात म्हणजेच रविवार(दि.6) दुपारी4.30 वाजता सुरू होणार आहे. यापूर्वी दोन्ही खेळाडू दोन वेळा आमने-सामने आले असून दोन्ही वेळेस कॅरोलिना मुचोवाने बाजी मारली आहे.
उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवाने पाचव्या मानांकित चीनच्या झेंग क्विनवेनला ६-३, ६-४ असे सहज पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्या सेटपासून मुचोवाने आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर एकदाही ऑलिम्पिक पदक विजेत्या झेंग क्विनवेनला लढतीमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही. पहिला व दुसरा सेट सहज जिंकून मुचोवाने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला.
India football : ‘भारत-व्हिएतनाम’मध्ये होणार मैत्रीपूर्ण लढत…
दुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये अमेरिकेच्या कोको गॉफने स्पेनच्या पॉला बाडोसाचे आव्हान ४-६, ६-४, ६-२ असे मोडून काढताना अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश केला. पहिल्या सेट ४-६ असा गमावल्यानंतर कोकोने आपला खेळ उंचावताना शानदार पुनरागमन केले. त्यानंतरचे दोन्ही सेटमध्ये कोकोने पॉलावर वर्चस्व राखताना अंतिम फेरीचे ध्येय साध्य केले. अंतिम फेरीत कोको समोर चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवाचे आव्हान असणार आहे.





