India football : ‘भारत-व्हिएतनाम’मध्ये होणार मैत्रीपूर्ण लढत…

नवी दिल्ली – दक्षिण पूर्व आशियाई स्पर्धा रद्द झाल्यामुळे भारतीय पुरुष फुटबॉल संघ 12 ऑक्टोबर रोजी व्हिएतनाम संघाविरुद्ध मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. या स्पर्धेत भरात, व्हिएतनाम व लेबनॉन हे तीन संघ सहभागी होणार होते. मात्र, लेबनॉनने मायदेशात सुरु असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाबाहेर उड्डाणकरण्यास अडचणी येत असल्याने या स्पर्धेतून माघार घेतली होती. ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने जारी केलेल्या निवेदनामध्ये ही घोषणा करण्यात आली होती. या निवेदनामध्ये लेबनॉन या स्पर्धेतून माघार घेत असल्याने भारत व व्हिएतनाम संघांदरम्यान मैत्रीपूर्ण लढतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामना थिएन ट्रुओंग, नमडीएनएच येथे खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ ५ ऑक्टोबर रोजी कोलकाता येथे दाखल होणार असून ६ ऑक्टोबरला एकदिवसीय सराव सत्राला सुरुवात होणार आहे.
ISSF Jr. World C’ship 2024 : भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर…
मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्क्वेझ यांच्यासह संघ ७ ऑक्टोबर रोजी व्हिएतनामलासाठी प्रस्थान करणार आहे. मार्क्वेझ यांनी यापूर्वी २६ संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली होती. संघाच्या प्रवासापूर्वी २३ खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हणण्यात आले आहे.





