China : ‘या’ ९ देशांच्या नागरिकांना चीनमध्ये व्हीसामुक्त प्रवेश; भारताचा समावेश आहे का? पाहा…
Updated On:

China – चीनने ९ पेक्षा अधिक देशांतील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. दक्षिण कोरिया, नॉर्वे आणि फिनलंडसह नऊहून अधिक देशांचे नागरिक आता चीनमध्ये व्हिसामुक्त प्रवेशासाठी पात्र असतील.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की 8 नोव्हेंबरपासून या देशांतील नागरिकांना व्यापार, पर्यटन, कौटुंबिक भेटी किंवा ट्रांझिटसाठी 15 दिवसांसाठी व्हिसाशिवाय चीनमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल.
तथापि, ही सूट 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध असेल. व्हिसा मुक्त देशांच्या यादीमध्ये स्लोव्हाकिया, डेन्मार्क, आइसलँड, अँडोरा, मोनाको, दक्षिण कोरिया, नॉर्वे, फिनलंड आणि लिकटेंस्टीन यांचा समावेश आहे.





