Kuldeep Yadav Wedding : कुलदीप यादव चढणार बोहल्यावर! ‘या’ तारखेला मसुरीत रंगणार शाही विवाह सोहळा; पाहा कोण आहे नवरी मुलगी?
Kuldeep Yadav Wedding : टीम इंडियाचा 'चायनामन' गोलंदाज कुलदीप यादव लवकरच आपल्या बालपणीची मैत्रीण वंशिका हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे.

Kuldeep Yadav Wedding with Vanshika : टीम इंडियाचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव लवकरच आपल्या बालपणीची मैत्रीण वंशिका हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा विवाह सोहळा १४ मार्च रोजी मसुरीमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडणार आहे. अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, त्यानंतर १७ मार्च रोजी लखनौमध्ये एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.
बालपणीची मैत्री अन् घरच्यांची संमती –
कुलदीप आणि वंशिका गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. वंशिका सध्या एलआयसी (LIC) मध्ये कार्यरत आहे. गेल्या वर्षीच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. कुलदीपचे वडील राम सिंह यादव यांनी नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे, ज्यामुळे या लग्नाची चर्चा आता रंगू लागली आहे.
विश्वचषकासाठी पुढे ढकलले लग्न –
T20 वर्ल्ड कप जीत के बाद कुलदीप यादव अपनी पर्सनल लाइफ में भी खुशियों की शुरुआत करेंगे। 14 मार्च को मसूरी के लग्ज़री रिसॉर्ट में वंशिका के साथ सात फेरे लेंगे।
हल्दी और मेहंदी की रस्में 13 मार्च को होंगी। सगाई पहले ही 4 जून 2025 को लखनऊ में हुई थी।#KuldeepYadav #TeamIndia… pic.twitter.com/D80AGK3rhH— India News UP/UK (@IndiaNewsUP_UK) March 10, 2026
वास्तविक, कुलदीप आणि वंशिका यांचा विवाह नोव्हेंबर २०२५ मध्येच नियोजित होता. मात्र, टी-२० विश्वचषक २०२६ ची तयारी आणि भारतीय संघाचे वेळापत्रक पाहता कुलदीपने देशहिताला प्राधान्य देत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता भारत विश्वविजेता बनल्यानंतर कुलदीप शांतपणे आपल्या आयुष्याच्या या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे.
आयपीएल २०२६ आणि कारकीर्द –
विवाह सोहळा आटोपल्यानंतर कुलदीप लगेचच आयपीएल २०२६ च्या तयारीला लागणार आहे. तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा महत्त्वाचा भाग असून संघाने त्याला रिटेन केले आहे. विश्वचषकात कुलदीपला मर्यादित संधी मिळाल्या, मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ३ षटकात १४ धावा देत १ बळी घेत त्याने आपली छाप पाडली होती. कुलदीपने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅट मिळून ३५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.





