IND vs SA : ‘गो बॅक!’ रोहितने DRS वरुन कुलदीपची घेतली फिरकी, पाहा मजेशीर VIDEO

Rohit Sharma Video Viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा डाव 47.5 षटकांत 270 धावांवर रोखला. दरम्यान सामन्यातील रोहित शर्मा आणि ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीपचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कुलदीपची डीआरएसची मागणी, रोहितचा ‘गो बॅक’चा इशारा
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 43व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेला एक चेंडू लुंगी एनगिडीच्या पॅडवर आदळला. यावर कुलदीपने जोरदार अपील केली, पण पंचांनी ‘नॉट आऊट’चा निर्णय दिला. यानंतर कुलदीपने कर्णधार केएल राहुलकडे बघत डीआरएस घेण्याची मागणी केली.
These are the moments we pay our internet bills for! 😉😁😍#INDvSA 3rd ODI, LIVE NOW 👉 https://t.co/Es5XpUmR5v pic.twitter.com/hPZJFPlJ0G
— Star Sports (@StarSportsIndia) December 6, 2025
यावेळी स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने त्वरित कुलदीपला डीआरएस घेण्यापासून रोखले. त्याचबरोबर त्याला गोलंदाजी करण्यासाठी परत जाण्यास सांगितले. रोहितचा हा मजेशीर अंदाज पाहून मैदानावरील सर्व खेळाडू हसताना दिसले. विशेष म्हणजे, कुलदीपने त्याच षटकात लुंगीची विकेट घेण्यात यश मिळवले.
हेही वाचा – Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा गाबा कसोटीत ‘डबल’ धमाका: 12 वर्षांनंतर ॲशेसमध्ये केला मोठा पराक्रम
कुलदीपने रोहितच्या प्रतिक्रियेबद्दल काय सांगितले?
पहिला डाव संपल्यानंतर ब्रॉडकास्टरशी बोलताना कुलदीप यादवने रोहितच्या प्रतिक्रियेवर भाष्य केले. तो म्हणाला, “मी डीआरएस घेण्यात खूप खराब आहे आणि रोहित नेहमी याच गोष्टीवरून माझी खिल्ली उडवतो. चेंडू पॅडवर आदळला की मला नेहमी फलंदाज ‘आऊट’ वाटतो.”
हेही वाचा – Quinton de Kock : क्विंटन डी कॉकचा कहर! भारताविरुद्ध शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्डसह केले अनेक विक्रम
तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुमच्याकडे रोहितसारखा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षणामागे केएल राहुलसारखा डीआरएस घेण्यात चांगला असलेला खेळाडू असतो, तेव्हा तुम्हाला प्रत्येक ‘नॉट आऊट’ निर्णय ‘आऊट’ वाटतो. अशा परिस्थितीत मैदानात शांत राहून योग्य निर्णय घेणारे लोक असणे आवश्यक आहे.”





