Chief Justice Attack : सरन्यायाधीशांवरील हल्ल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक ; गोपाळ तिवारींची केंद्राकडे कठोर कारवाईची मागणी
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा निंदनीय प्रयत्न हा संविधानिक न्यायव्यवस्थेवर हल्ला असल्याने, पंतप्रधानांनी केवळ ट्वीट किंवा फोनद्वारे निषेध करून थांबू नये, तर याप्रकरणी वकील राकेश किशोरवर केंद्र शासनाने गुन्हा दाखल करून न्यायव्यवस्थेविषयी आदर आणि सन्मान कृतीतून सिद्ध करावा, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
४५० वर्षांपासून प्रलंबित असलेला राम मंदिर-बाबरी मशीद वाद स्वतंत्र भारताच्या लोकशाहीतील तिसऱ्या स्तंभ मानल्या जाणाऱ्या न्यायव्यवस्थेच्या आधारेच शांततेने व कायदेशीर मार्गाने सुटू शकला. हीच स्वतंत्र भारताच्या लोकशाहीची गुणसंपन्नता आहे. त्यामुळे केंद्र शासनाने याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.





