अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्री का केले नाही? ; 4 मोठी कारणे आली समोर ; वाचा सविस्तर

Chhagan Bhujbal । महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाला अंतिम रूप दिल्यानंतर महायुतीतील प्रत्येक मित्रपक्षात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून मंत्रिमंडळात समावेश न केल्याने अनेक नेते आपल्या पक्षाच्या हायकमांडवर नाराज आहेत. त्यात सर्वात मोठे नाव अजित पवार गटातील छगन भुजबळांचे होते, ज्यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. याबाबत भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती.
छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्री न करण्याच्या कारणाबाबत राष्ट्रवादीकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र, आता एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी त्यांचे खास नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्राचे मंत्री का होऊ दिले नाही यामागे चार मोठी कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. नेमकी ती चारकारणे काय आहेत. ते समजून घेऊ…
मुलाने निवडणूक लढविल्याने राष्ट्रवादीचे नेते नाराज Chhagan Bhujbal ।
त्याचे पहिले कारण म्हणजे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्यामुळे पक्षातील लोक नाराज होते.
त्याचवेळी, दुसरे मोठे कारण म्हणजे छगन भुजबळ यांनी त्यांचा मुलगा पंकज भुजबळ यांना बळजबरीने विधानपरिषदेच्या आमदारपदासाठी उभे केले होते, ते राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना चांगलेच खटकले होते.
नाशिकमधील सर्व आमदारांची सामूहिक राजीनाम्यची धमकी Chhagan Bhujbal ।
याशिवाय तिसरे कारण म्हणजे समीर भुजबळ यांनी पक्षाविरोधात जाऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. महाआघाडीतील मित्रपक्षांसाठी ही मोठी बाब होती.
चौथे आणि शेवटचे कारण समोर आले ते म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांनी अजित पवार यांना छगन भुजबळांना मंत्रीपद देऊ नये अशी विनंती केली होती. भुजबळांना मंत्रिपद दिल्यास नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार एकत्र राजीनामा देतील, अशी घोषणा आमदारांकडून करण्यात आली.
1999 पासून अनेकवेळा मंत्री
छगन भुजबळ यांनी 1999 ते 2024 पर्यंत अनेक वेळा मंत्रीपद भूषवले आहे. भुजबळ हे 1999 ते 2003 आणि 2009 ते 2010 पर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. 2010 ते 2014 पर्यंत भुजबळ यांच्याकडे पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन खात्याची जबाबदारी होती. यानंतर 2019-22 मध्ये छगन भुजबळ हे तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक खात्याचे मंत्री होते. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांना पुन्हा तीच जबाबदारी देण्यात आली.
हेही वाचा
जम्मू काश्मीरमध्ये लष्कराकडून 5 दहशतवाद्यांचा खात्मा ; 2 सुरक्षा जवान गंभीर जखमी
Elephanta Boat Accident : मुंबई बोट दुर्घटनेत आतापर्यंत ‘एवढ्या’ जणांचा मृत्यू; नावं आली समोर, वाचा सविस्तर…





