Elephanta Boat Accident : मुंबई बोट दुर्घटनेत आतापर्यंत ‘एवढ्या’ जणांचा मृत्यू; नावं आली समोर, वाचा सविस्तर…

Elephanta Boat Accident : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटा बेटावर जाणाऱ्या नीलकमल नावाच्या प्रवासी जहाजाला नौदलाच्या जहाजाची धडक बसून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन नौदल कर्मचाऱ्यांसह एकूण 13 जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इतर 101 प्रवासी वाचले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेकांचा शोध सुरू आहे. तर दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आताच्या ताज्या आकडेवारी नुसार नीलकमल बोटीत साधारण 120 प्रवाशी प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. यात 114 जणांचा आतापर्यंत शोध लागला आहे. त्यातील 97 जणांची प्रकृती स्थिर आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
#WATCH | Mumbai Boat Accident | Morning visuals from Gateway of India
Yesterday a Navy boat collided with ‘Neelkamal’ passenger vessel at around 3:55 pm, near Jawahar Dweep (Butcher Island)
101 people have been rescued safely and 13 people have died. Among the 13 deceased, 10… pic.twitter.com/EaKVnR1ycd
— ANI (@ANI) December 19, 2024
जेएनपीटी रुग्णालयात एकूण 57 जणांना दाखल करण्यात आले होते. त्यातील 53 प्रवाशांची प्रकृती स्थिर असून 3 जण गंभीर आहेत. तर एकाच मृत्यू झाला आहे. तसेच नेव्हीच्या डॉकयार्ड रुग्णालयात 25 जणांना दाखल करण्यात आले होते. त्यातील 23 जणांची प्रकृती स्थिर असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच बाकी प्रवासींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात नेमका कसा घडला?
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियातून प्रवाशी नीलकमल ही बोट एलिफंटाकडे जात होती. यावेळी त्याच ठिकाणी समूद्रात नेव्हीच्या बोटीच्या नवीन इंजिनचे टेस्टिंग सुरू होते. त्यामुळे ही बोट समुद्रात आठ या आकारात फिरत होती.
त्याचवेळी एक राऊंड मारून आलेल्या या बोटीने समोरून नीलकमल या बोटीला धडक मारली. नवीन इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर या बोटीवरचे नियंत्रण सुटले आणि तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिल्याची माहिती नेव्हीने दिली आहे.
मृत व्यक्तींची नावे
महेंद्रसिंग शेखावत ( नेव्ही), प्रवीण शर्मा, मंगेश (NAD बोट वरील कामगार) , मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी बोट) , राकेश नानाजी अहिरे( प्रवासी बोट), साफियाना पठाण मयत महिला ,माही पावरा मयत मुलगी वय-३ तीन , अक्षता राकेश अहिरे , अनोळखी मयत महिला , अनोळखी मयत महिला , मिथु राकेश अहिरे वय- ८ वर्षे , दिपक व्ही. , अनोळखी पुरुष.





