जम्मू काश्मीरमध्ये लष्कराकडून 5 दहशतवाद्यांचा खात्मा ; 2 सुरक्षा जवान गंभीर जखमी

Jammu & Kashmir । जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलास यश आले आहे. दरम्यान, या चकमकीत दोनदेखील जवान जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
कुलगाम जिल्ह्यातील बेहीबाग भागातील कद्दर याठिकाणी काल रात्री, संशयित दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले.त्यात पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिली ही माहिती Jammu & Kashmir ।
एका वृत्तसंस्थेशी बोलताना अधिकाऱ्यांनी या चकमकीविषयी माहिती दिली. याविषयी माहिती देताना अधिकाऱ्यांनी, ‘संशयित दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी बुधवारी रात्री जिल्ह्यातील बेहीबाग भागातील कद्दर गावाला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली” असे ते म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले की, “शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि ऑपरेशनचे चकमकीत रूपांतर झाले. घटनेची सविस्तर माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.
OP KADER, Kulgam
On 19 Dec 24, based on specific intelligence input regarding presence of terrorists, a Joint Operation launched by #IndianArmy & @JmuKmrPolice at Kader, Kulgam. Suspicious activity was observed by vigilant troops and on being challenged, terrorists opened… pic.twitter.com/9IxVKtDZkl
— Chinar Corps🍁 – Indian Army (@ChinarcorpsIA) December 19, 2024
लष्कराने सोशल मीडियावर माहिती दिली
लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सोशल मीडियावर माहिती देताना,”या वेळी, सतर्क सैनिकांना संशयास्पद हालचाली दिसल्या आणि जेव्हा त्यांना आव्हान दिले तेव्हा दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला आणि आमच्या सैनिकांनी प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले.
सुरक्षा व्यवस्थेबाबत होणार बैठक ? Jammu & Kashmir ।
एका वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणुकीनंतर गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत आज दिल्लीत बैठक घेऊ शकतात. या बैठकीला लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, लष्कर, निमलष्करी दल, जम्मू-काश्मीर प्रशासन, गुप्तचर संस्था आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहू शकतात. याआधी १६ जूनला उच्चस्तरीय बैठकही झाली होती.





