Cheteshwar Pujara : “मला फक्त एक संधी हवी आहे…”, चेतेश्वर पुजाराने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी व्यक्त केलं खंत

Cheteshwar Pujara tells BCCI he only wants one chance : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा बऱ्याच काळापासून पुनरागमनाची वाट पाहत आहे. पुजारा शेवटचा २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाकडून खेळला होता. तेव्हापासून त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकलेले नाही. संघात पुनरागमन करण्यासाठी पुजाराने देशांतर्गत क्रिकेट तसेच काउंटी क्रिकेटमध्ये कठोर परिश्रम केले, परंतु तो पुनरागमन करण्यात यशस्वी होऊ शकला नाही. आता यावर त्याने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
चेतेश्वर पुजारा पुनरामनासाठी उत्सुक –
पुजारा म्हणाला, “एक क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला नेहमीच भारतीय संघाकडून खेळायचे असते. टीम इंडियासाठी खेळण्यासाठी मी जे काही करू शकतो ते करत आहे. जर संघाला माझी गरज असेल तर मी नक्कीच तयार आहे. मी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. मी गेल्या काही वर्षांपासून काउंटी क्रिकेट खेळत आहे. मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा करत आहे. म्हणून जर मला संधी मिळाली तर मी ती दोन्ही हातांनी घेण्यास तयार आहे.”
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विजयाची हॅटट्रिक साधू शकलो असतो -पुजारा
पुजारा पुढे म्हणाला, ”मला पूर्ण विश्वास होता. जर मी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेसाठी संघात असतो, तर कदाचित आपण बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विजयाची हॅटट्रिक साधू शकलो असतो.” याशिवाय, त्यांनी आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाबाबतही आपले मत व्यक्त केले. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवणे आव्हानात्मक असेल, असा पुजाराचा विश्वास आहे. कारण इंग्लंडला त्यांच्या घरच्या परिस्थितीचा फायदा मिळेल.
🚨Cheteshwar Pujara on Border Gavaskar Trophy
“If I was there we would have made a hattrick at BGT” – Cheteshwar Pujara at Trailblazers 3.0.@HSBC @cheteshwar1 #CheteshwarPujara #BGT pic.twitter.com/H1Zp6ElBcN
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) March 6, 2025
इंग्लंडचा संघ निश्चितच कमकुवत –
इंग्लंडबद्दल बोलताना चेतेश्वर पुजारा म्हणाला, ”जेम्स अँडरसनच्या निवृत्तीनंतर इंग्लंडचा संघ निश्चितच कमकुवत झाला आहे. तसेच स्टुअर्ट ब्रॉड देखील संघात नाही, अशा परिस्थितीत भारतीय संघाला इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवण्याची चांगली संधी आहे. कारण या दोन्ही खेळाडूंशिवाय इंग्लंडचा संघ खूपच कमकुवत दिसत आहे.”





