काउंटी स्पर्धेत चेतेश्वर पुजाराचे वर्चस्व
Updated On:

लंडन – भारतीय संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी क्रिकेट स्पर्धेत अफलातून यश प्राप्त केले आहे. त्याने चार शतके साकार केली असून यंदाच्या मोसमात त्याने दोन द्विशतकेही फटकावली आहेत.
ससेक्सकडून खेळताना पुजाराने स्पर्धेतील चौथे शतक साकार केले. या खेळीत त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रीदीच्या गोलंदाजीवर अप्पर कट या फटक्याद्वारे मारलेला षटकार सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सातत्याने सुमार कामगिरी झाल्यामुले पुजाराला भारताच्या कसोटी संघातील स्थान गमवावे लागले होते.
त्यानंतर त्याला आयपीएलच्या कोणत्याही संघाने खरेदी केले नसल्यामुळे तो इंग्लंडला काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी रवाना झाला होता व याच स्पर्धेत त्याने गमावलेला सुर परत मिळवला आहे.





