Cheteshwar Pujara’s brother-in-law commits suicide : माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराच्या कुटुंबातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. पुजाराचा मेहुणा जीत पाबारी याने राजकोट येथील त्यांच्या निवासस्थानी कथितरित्या आत्महत्या केली आहे. ही घटना घडली, तेव्हा पुजारा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यासाठी टीव्हीवर कॉमेंट्री करत होता. घटनेची माहिती मिळताच त्याने कॉमेंट्रीचे काम सोडून दिले आणि घरी परतला. बलात्कार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप – नोव्हेंबर २०२४ मध्ये राजकोट येथे जीत पाबरीचा एका मुलीशी साखरपुडा झाला होता. मात्र, त्याने काही दिवसांनी साखरपुडा मोडलाल आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केले. यानंतर ज्या मुलीसोबतचा साखरपुडा मोडला होता, त्या मुलीने जीत पाबरीविरोधात बलात्काराची आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. राजकोटमधील या मुलीने दावा केला होता की, जीतने त्यांचा साखरपुडा झाल्यानंतर अनेक वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर कोणतेही कारण नसताना साखरपुडा मोडला आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केले. या घटनेनंतर जीतने दुसऱ्या मुलीशी विवाह केला होता, ज्यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आले. तक्रारकर्त्याने असाही दावा केला होता की, तिला चेतेश्वर पुजाराच्या नावाचा वापर करून धमकावण्यात आले होते. या सर्व आरोपांमुळे जीत पाबारी मानसिक तणावाखाली होता आणि कुटुंबियांच्या मते, तो गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात दिसत होता. हेही वाचा – IND vs SA : टेम्बा बावुमा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच कर्णधार कशी घडली घटना? रिपोर्ट्सनुसार, जीत पाबरी राजकोट येथे कुटुंबासोबत राहत होता. घटनेच्या दिवशी त्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर घरातील आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. तथापि, प्राथमिक तपासात हे आत्महत्येचे प्रकरण मानले जात असून, पोलीस यामागील नेमक्या कारणांचा तपास करत आहेत. हेही वाचा – Gautam Gambhir : भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर चाहत्यांचा संताप; गौतम गंभीरला स्टेडियममध्येच घेरलं, पाहा VIDEO पुजारा कुटुंबावर दुःखाचा डोंगर – या घटनेची माहिती मिळताच चेतेश्वर पुजारा यांनी तात्काळ कॉमेंट्रीचे काम थांबवले. जीतच्या निधनाने पुजारा कुटुंब पूर्णपणे धक्क्यात असून, त्यांच्या परिचित आणि स्थानिक क्रीडा समुदायातही शोककळा पसरली आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, मानसिक तणाव किंवा मागील वर्षी दाखल झालेल्या प्रकरणाचा या आत्महत्येशी संबंध आहे का, याचा तपास केला जाईल. शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती समोर येईल.