केमिकल टँकर आणि ट्रकची समोरासमोर टक्कर, भीषण आग लागून 2 जणांचा होरपळून मृत्यू

मनमाड – आयशर ट्रक आणि केमिकल टँकरची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांना आग लागल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे लागलेल्या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे व दोन जण जखमी झाले आहेत. मनमाड-मालेगाव मार्गावर कौळाने जवळ हा अपघात घडला आहे.
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड-मालेगाव मार्गावर सोमवारी रात्रीच्या वेळी केमिकल घेऊन जाणारा टँकर आणि आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. दोन्हीं वाहनांची जोरदार धडक झाल्यामुळे या वाहनांनी अचानक पेट घेतला. या भीषण आगीमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. तसेच दोन्ही वाहने सु्द्धा जळून खाक झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. केमिकल घेऊन जाणारा टँकर पुणे येथून राजस्थानकडे जात होता तर आयशर ट्रक मनमाडकडे येत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे मनमाड-मालेगाव मार्गावर सुमारे तीन तास वाहतुक कोंडी झाली होती.
हे ही वाचा
खंबाटकी घाटात ट्रक उलटल्याने वाहतूक विस्कळीत
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराला ‘त्या’ प्रकरणी अटक
मीरा चोप्रावर फसवणुकीचा आरोप





