बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण आणि अभिनेत्री मीरा चोप्रा ही सतत कोणत्या-न-कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आता मीरा चोप्रा ही करोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मीराने एका हेल्थ केअर सेंटरचे खोटे ओळखपत्र दाखवीत लस घेत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मीरा चोप्रावर आरोप करण्यात आला आहे की, तिने स्वतःला फ्रंटलाइन वर्कर असल्याचे सांगत लसीकरण करून घेतले आहे. यासंबंधित तिचे एक आयडी कार्डदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यासंबंधी चौकशी करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. यानंतर याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे असून तीन दिवसांत अहवाल सादर करण्यात येणार आहे.
या आरोपाबाबत मीरा चोप्राने खुलासा करत सांगितले की, आपण सर्व जण लस घेऊ इच्छित असून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. याच प्रकारे मी ओळखीच्या एका सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन केले. यानंतर मी माझे आधार कार्डही त्यांना पाठविले. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ओळखपत्र माझे नाही, असेही तिने स्पष्ट केले आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास मीरा चोप्राने “एनबे आरूयीरे’ या तमिळ चित्रपटातून डेब्यू केले होते. याशिवाय ती नुकतीच “द टॅटू मर्डर्स’ या वेबसिरीजमध्ये झळकली होती. तसेच मीरा चोप्राने “1920 लंडन’ आणि “सेक्शन 375′ या हिंदी चित्रपटातही काम केलेले आहे.