मुंबई – पत्नीला मारहाण केल्या प्रकरणी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक करण्यात आली आहे. सोमवारी गोरेगाव पोलिसांनी ही अटक केली आहे. अभिनेता करण मेहरा आणि पत्नी निशा रावल यांच्यात कडाक्याचे भांडण झाले यामधूनच अभिनेत्याने आपल्या पत्नीस मारहाण केली. करणच्या अटकेच्या बातमीमुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या प्रसिद्ध मालिकेत अभिनय करणारा करण मेहरा व त्याची पत्नी यांच्यात अनेक वेळा वाद झाले. मात्र काल या नवराबायकोमधील वाद चांगलाच विकोपाला गेला आणि दोघांत कडक्याचे भांडण झाले. त्यामधूनच करणने निशाला मारहाण केली. त्यानंतर मारहाण प्रकरणी निशाने करण विरोधात गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारी नंतर पोलिसांनी अभिनेत्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार त्यास काल अटक करण्यात आली आहे. अशी माहिती एका वृत्तवाहिनीकडून देण्यात आली. दरम्यान करणला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हे ही वाचा
मदतीचा दिखावा कशाला?