Jamkhed News : चौंडीतील ‘त्या’ प्रकाराने अहिल्या भक्त संतप्त; आयोजकांसह प्रा. राम शिंदे यांनी मागितली जाहीर माफी
Jamkhed News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पावन जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक रथयात्रा उत्सवाला एका अनुचित प्रकारामुळे गालबोट लागले आहे.

Jamkhed News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पावन जन्मगाव असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या रथयात्रा उत्सवाला एका अनुचित प्रकारामुळे गालबोट लागले आहे. (Jamkhed News)
या उत्सवादरम्यान व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर नृत्यांगनांचा नृत्यविष्कार आयोजित करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर संपूर्ण राज्यभरातील अहिल्या भक्तांमधून आणि शिव-अहिल्या प्रेमींमधून अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Jamkhed News)
घटनेचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत आयोजक, चौंडी ग्रामस्थ आणि स्वतःच्या वतीने समस्त अहिल्या भक्तांची बिनशर्त माफी मागितली आहे. (Jamkhed News)
चौंडी येथे दरवर्षी पारंपरिक उत्साहात रथयात्रा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमाच्या मुख्य व्यासपीठावर पाठीमागे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मोठी प्रतिमा (बॅनर) लावली होती आणि त्याच प्रतिमेसमोर नृत्यांगनांच्या नृत्याचा कार्यक्रम पार पडला. (Jamkhed News)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या अढळ आणि आदरणीय व्यक्तित्वाच्या प्रतिमेसमोर असा कार्यक्रम आयोजित केल्याने अहिल्या भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर चौफेरातून टीकेची झोड उठली. (Jamkhed News)
या सर्व वादावर स्पष्टीकरण देताना प्रा. राम शिंदे म्हणाले की, “चौंडीसह परिसरातील नान्नज, जवळा, चापडगाव आणि इतर ४-५ गावांमध्ये वर्षांनुवर्षे पारंपरिक पद्धतीने अशा रथयात्रा आयोजित केल्या जातात. तेथे स्थानिक पातळीवर कलाकारांचे कलाविष्कारही होतात. मात्र, अशा कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पाठीमागील फलकावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो लावणे ही अत्यंत गंभीर आणि अक्षम्य चूक आहे. (Jamkhed News)
ते पुढे म्हणाले की, “हा प्रकार घडल्याचे निदर्शनास येताच मी स्वतः त्याच वेळी आयोजकांकडे तीव्र नाराजी व्यक्त करून त्यांना योग्य ती समज दिली होती. आता व्हिडिओ समोर आल्यानंतर आयोजकांना पुन्हा एकदा त्यांच्या चुकीची कडक शब्दांत जाणीव करून देण्यात आली आहे.” (Jamkhed News)
या कारवाईनंतर संबंधित आयोजकांनी आपली गंभीर चूक प्रामाणिकपणे मान्य केली आहे. अहिल्या भक्तांच्या भावना दुखावल्याबद्दल आयोजकांनी सर्व अहिल्या भक्तांची जाहीर माफी मागितली आहे. (Jamkhed News)
तसेच, “यापुढील काळात चौंडी अथवा परिसरातील कोणत्याही धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही आणि उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल,” अशी लेखी व तोंडी ग्वाही आयोजकांनी दिली आहे. (Jamkhed News)
शेवटी बोलताना प्रा. राम शिंदे यांनी, “ग्रामस्थ, आयोजक आणि माझ्या व्यक्तिगत वतीने मी सर्व अहिल्या भक्तांची मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतली जाईल,” असा विश्वास दिला. (Jamkhed News)
Jamkhed News : अहिल्यादेवींच्या पावन भूमीत घडलेल्या प्रकारावर प्रा. राम शिंदेंकडून दिलगिरी व्यक्त






