लोकसभा निवडणुकीमुळे ‘युपीएससी’ परीक्षेच्या तारखेत बदल; आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा

UPSC exam postponed| लोकसभा निवडणूकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. देशभरात सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. परंतु लोकसभा निवडणुकीचा फटका केंद्रीय लोकसेवा आयोगाला बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) 2024 ची तारीखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही परीक्षा 26 मे 2024 रोजी होणार होती, मात्र आता ही परीक्षा लोकसभा निवडणुकीनंतर नंतर घेतली जाणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 14 फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वपरीक्षेसाठी अधिसूचना जारी केली होती. नोटीसमध्ये आयोगाने परीक्षेची तारीख 26 मे दिली होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 16 जून 2024 रोजी होणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र आणि परीक्षेच्या नियमांची माहिती वेळेत दिली जाईल. UPSC exam postponed|
दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एकूण 1206 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यापैकी 1056 पदे भारतीय प्रशासकीय सेवा / IAS (नागरी सेवा) साठी आरक्षित आहेत. तर, 150 पदे भारतीय वन सेवेसाठी (IFS) राखीव आहेत.
𝗨𝗣𝗦𝗖 𝗣𝗿𝗲𝗹𝗶𝗺𝘀 𝟮𝟬𝟮𝟰 𝗵𝗮𝘃𝗲 𝗯𝗲𝗲𝗻 𝗿𝗲𝘀𝗰𝗵𝗲𝗱𝘂𝗹𝗲𝗱.
•𝗘𝘅𝗮𝗺 𝗼𝗿𝗶𝗴𝗶𝗻𝗮𝗹𝗹𝘆 𝘀𝗰𝗵𝗲𝗱𝘂𝗹𝗲𝗱 𝗳𝗼𝗿 𝗠𝗮𝘆 𝟮𝟲𝘁𝗵 𝗵𝗮𝘀 𝗯𝗲𝗲𝗻 𝗺𝗼𝘃𝗲𝗱 𝘁𝗼 𝗝𝘂𝗻𝗲 𝟭𝟲𝘁𝗵 pic.twitter.com/nIVvNZC2ig
— Upsc Civil Services Exam (@UpscforAll) March 19, 2024
आता या तारखेला होणार परीक्षा
UPSC ने दिलेल्या माहितीनुसार आता सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमरी (CSE) परीक्षा 26 मे 2024 ऐवजी 16 जून 2024 रोजी घेतली जाईल. या परीक्षेची अर्ज प्रक्रिया 14 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024 या कालावधीत पूर्ण झाली होती. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेच्या तारखेच्या काही दिवस आधी प्राथमिक परीक्षेत बसण्यासाठी प्रवेशपत्रे दिली जातील. UPSC CSE प्रीलिम परीक्षा 2024 शी संबंधित इतर माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात असेही आयोगाकडून सांगण्यात आले आहे. UPSC exam postponed|
हेही वाचा:





