चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांनी साकारली भारतातील पहिली स्मार्ट बिलिंग सुविधा -बिलिंग च्या रांगेमधून सुटका

पुणे : आपल्या वैशिष्ठयपूर्ण दागिन्यांनी संपूर्ण ज्वेलरी क्षेत्रात मानाचे स्थान संपादन केलेले चंदुकाका सराफ ज्वेल्स् ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या वैविध्यपूर्ण सेवांमध्ये नेहमीच अग्रेसर राहतात. याचेच एक उदाहरण म्हणजे ज्वेलरी क्षेत्रातील बिलिंग सिस्टीममध्ये क्रांतिकारक बदल ठरणारा आणि ग्राहकांना अतिशय सुलभतेने पेमेंट करून बिलिंग च्या रांगेपासून सुटका देण्याचा अभूतपूर्व पर्याय म्हणजे “स्मार्ट बिलिंग”या सुविधेचा शुभारंभ चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांनी नुकताच केला. या मध्ये ग्राहकांना व्हाट्सप बिलींग व सेल्फ बिलींग या सेवा देण्यात आल्या आहेत.
अशाप्रकारची सेवा सादर करणारी चंदुकाका सराफ ज्वेल्स् हि भारतातील पहिली सुवर्ण पेढी ठरली आहे. शासनाच्या डिजिटल इंडिया या संकल्पने अंतर्गत ऑनलाईन पेमेंट पद्धतीला चालना देण्यासाठी चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांनी हि सुविधा ग्राहकांसाठी प्रस्तुत केली आहे.
स्मार्ट बिलिंग या सुविधे अंतर्गत ग्राहक त्यांनी निवडलेल्या दागिन्यांच्या एस्टीमेट डिलिव्हरी नोट मार्फत पेमेंट करून बिलिंग च्या रांगेमध्ये न थांबता त्यांच्या खरेदीचे पेमेंट करू शकतील आणि तात्काळ आपला निवडलेला दागिना अगदी कमी वेळेत आनंदाने घरी घेऊन जाऊ शकतील.
“स्मार्ट बिलिंग सुविधेमुळे ग्राहकांचा वेळ वाचणार असून दिवाळीनिमित्त आपले आवडते दागिने झटपट खरेदी करण्यासाठी आमच्या नजिकच्या सुवर्ण दालनाला भेट द्या” असे आव्हान चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे संचालक श्री सिद्धार्थ शहा यांनी केले आहे. सदरची सुविधा सध्या चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांच्या महाराष्ट्र व कर्नाटकमधील सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे.





