चांद्रयान-३ पोहोचेल आणखी चंद्राच्या जवळ; लँडर वेगळे झाल्यानंतर आज संध्याकाळी होणार डिबूस्टिंग

नवी दिल्ली : भारत आता चंद्रावर पोहोचण्यापासून फक्त काही पावले दूर आहे. चांद्रयान-३ दिवसेंदिवस चंद्राच्या जवळ येत आहे. गुरुवारी विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे झाल्यानंतर आता संपूर्ण देश आणि इस्रोचे शास्त्रज्ञ लँडिंगची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, येणारे काही दिवस खूप महत्वाचे ठरणार आहेत ज्यामध्ये लँडरचा वेग कमी केला जाईल आणि सॉफ्ट लँडिंगची तयारी करण्यात येणार आहे.
प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाल्यानंतर, लँडर ‘विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ यांचा समावेश असलेले लँडर मॉड्यूल आता एका कक्षेत उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. जे त्यांना चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ आणतील. यानंतर, 23 ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
Chandrayaan-3 Mission:
‘Thanks for the ride, mate! 👋’
said the Lander Module (LM).LM is successfully separated from the Propulsion Module (PM)
LM is set to descend to a slightly lower orbit upon a deboosting planned for tomorrow around 1600 Hrs., IST.
Now, 🇮🇳 has3⃣ 🛰️🛰️🛰️… pic.twitter.com/rJKkPSr6Ct
— ISRO (@isro) August 17, 2023
मागच्या वेळेच्या तुलनेत यावेळी चांद्रयान-३ मध्ये असे बदल करण्यात आले आहेत की सॉफ्ट लँडिंग सहज करता येणे शक्य होणार आहे. दरम्यान, ही सॉफ्ट लँडिंग संध्याकाळी ५.४७ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर करण्याचा प्रयत्न असणार आहे.
दरम्यान, या सगळ्यात आता लँडर वेगळे केल्यानंतर इस्रोने ट्विटरवर माहिती देताना,”लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे केले गेले आहे. ते डीबूस्टिंग (वेग कमी करण्याची प्रक्रिया) पार पाडून शुक्रवार, 18 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता चंद्राच्या कक्षेत थोडेसे खाली येणे अपेक्षित आहे. ” त्यामुळे आजचा देखील टप्पा अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.





