BJP Politics : चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रमोशन! भाजपनं राष्ट्रीय पातळीवर दिली मोठी जबाबदारी
BJP Politics : भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी संघटनात्मक सहप्रभारी म्हणून मोठी राष्ट्रीय जबाबदारी सोपवली आहे.

BJP Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे-पाटील यांच्या टीकेला सामोरे जाणारे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने आता राष्ट्रीय पातळीवर मोठी संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बावनकुळे यांची संघटनात्मक सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. (BJP Politics)
राजस्थानची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भाजपने आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्याचाच भाग म्हणून संघटनात्मक सहप्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (BJP Politics)
महाराष्ट्रात बावनकुळे यांच्यावर जरांगे-पाटील यांच्याकडून सातत्याने टीका होत असतानाच भाजपने त्यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (BJP Politics)
पक्षसंघटनेतील अनुभवाचा फायदा
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काळात त्यांच्यावर पक्षाचे मुख्य निवडणूक प्रभारी म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली होती. (BJP Politics)
पक्षसंघटना मजबूत करण्याचा अनुभव आणि निवडणूक व्यवस्थापनातील कामगिरी लक्षात घेऊन भाजप नेतृत्वाने बावनकुळेंवर राजस्थानची जबाबदारी सोपवल्याचे मानले जात आहे. (BJP Politics)
मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांनंतर आता राष्ट्रीय जबाबदारी
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र, आता भाजपने त्यांच्यावर थेट राष्ट्रीय स्तरावरील निवडणूक संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. (BJP Politics)
बावनकुळेंना नवी जबाबदारी मिळाल्यानंतर भाजप नेते भागवत कराड यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. राजस्थानची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत बावनकुळे भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत आपला प्रभाव आणखी वाढवणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (BJP Politics)






