Chandra Kumar Bose : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस (Chandra Kumar Bose) यांनी रविवारी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. काही वर्षांपूर्वी भाजपला रामराम ठोकणाऱ्या चंद्रकुमार यांचा निर्णय ऐन निवडणूक काळात तृणमूलचे मनोबल उंचावणारा आहे. चंद्रकुमार (Chandra Kumar Bose) यांनी वर्ष २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर्षी त्यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भवानीपूरमधून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, ममतांना ते विजयापासून रोखू शकले नाहीत. त्यानंतर वर्ष २०१९ मध्ये चंद्रकुमार यांनी कोलकता दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळीही त्यांना यश मिळू शकले नाही. Chandra Kumar Bose पुढील काळात त्यांचे भाजपच्या नेतृत्वाशी मतभेद निर्माण झाले. त्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये ते भाजपमधून बाहेर पडले. पुढील काळात विविध मुद्द्यांवर घेतलेल्या भूमिकांवरून त्यांनी ममतांची जाहीर प्रशंसा केली. काही दिवसांपूर्वीच चंद्रकुमार यांनी भाजपमधील प्रवेशाचा उल्लेख ऐतिहासिक चूक अशा शब्दांत केला. आता ते तृणमूलचा भाग बनले आहेत. त्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपकडून (Chandra Kumar Bose) विभाजनवादी राजकारण केले जाते. तो पक्ष नेताजींच्या तत्वांचा अंगिकार करत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.