Warnavati News : चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Warnavati News :

Warnavati News : चांदोली धरण परिसर व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर थोडा मंदावला असला तरी धरणात २८.४२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी दुपारी ४.३० वाजता धरणाच्या वक्राकार दरवाज्यातून २००० क्युसेक व विद्युत गृहातून १४०० असा एकूण ३४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे. (Warnavati News)
त्यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरणात ८१२६ क्युसेक पाण्याची आवक सुरु असून पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्गात वाढ केली जाणार असल्याचीही माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. (Warnavati News)
सध्या धरणात २८. ४२ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ८२.६२ टक्के भरले आहे. आजअखेर एकूण १३७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी एकूण १९०० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली होती. त्यामानाने यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. (Warnavati News)





