पुणे/औंध – बाणेर येथील धनकुडे फार्म येथे बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने परिसरातील गोरगरीब नागरिकांना “ना नफा-ना तोटा’ या तत्वावर किराणामाल सरंजाम किटचे वाटप करण्यात आले. या उप्रमाचा शुभारंभ पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व आमदार चेतन तुपे पाटील, आमदार सुनील टिंगरे, पालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, पुणे शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षा स्वाती पोकळे, मुळशी, भोर, वेल्हा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष सुनील चांदेरे, कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला अध्यक्षा ज्योती सुर्यवशी यांच्या उपस्थितीत झाला. रविवारी (दि. 8) झालेल्या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोत व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, सरचिटणीस विशाल काळभोर, तेजस शशिकांत शिंदे, सुनिल गव्हाणे, स्वप्नील दुधाने, निलेश माजिरे, संतोष पाषाणकर, मनोज बालवडकर, किरण बालवडकर, राहुल बालवडकर, चेतन बालवडकर आदी उपस्थित होते. मुख्य आयोजक बाबुराव चांदेरे म्हणाले की, 2006 पासून ते 2016 पर्यंत अखंडपणे दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रम केला आहे. 2020 या काळात करोनाच्या प्रादुर्भावामुळे गोरगरीब नागरिक अडचणीत सापडले आहेत. यापार्श्वभुमीवर यावर्षीही सदर उपक्रम राबविण्यात आला आहे. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, काही लोकांना निवडणूकी पुर्त देव आठवतो पण इथे सर्वसामान्य माणसामध्ये आम्हाला देव दिसत आहे. हीच भूमिका ठेऊन बाबुराव चांदेरे समाजाची बांधिलकी जपत आहेत. यावेळी अर्जुन शिंदे, बाबुराव विधाते, अर्जुन ननावरे, जंगल रणवरे, समीर चांदेरे, विशाल विधाते, शेखर सायकर, संजय ताम्हाणे, बालम सुतार, प्राजक्ता ताम्हाणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन कळमकर यांनी व प्रणव कळमकर यांनी आभार मानले.