पुणे शहर परिसरात पावसाची शक्यता
Updated On:

पुणे – मागील चार दिवसांपासून कमी झालेल्या जोर थंडीचा पुन्हा वाढणार आहे. 16 अंशांपर्यंत गेलेले किमान तापमान 14 अंश सेलिअसपेक्षा खाली येईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरींची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
शहरातील वाढत्या थंडीमुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, सततच्या हवामान बदलामुळे मागील चार दिवसांपासून थंडीचा जोर कमी अधिक होत आहे. दिवसभर ऊन, मध्येच ढगाळ वातावरण आणि रात्री थंडी तर पहाटे धुके असे वातावरण पुणेकर सध्या अनुभवत आहे. दरम्यान, दि. 3 नोव्हेंबरपर्यंत पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील हवामानात बदल होत आहे. हवेतील आर्द्रता कमी होवून ढगाळपणा कमी होईल आणि आकाश निरभ्र राहील.





