चंपाई सोरेन जेएमएममध्ये परतणार? ; एका पोस्टने राजकीय चर्चांना उधाण

Champai Soren । झारखंडमध्ये सध्या राजकीय उलथापालथ होणार असल्याचा चर्चांना उधाण आले आहे. कारण त्याठिकाणच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चंपाई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता चंपाई सोरेन हेमंत सोरेन यांच्या पक्षात परतणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेमंत सोरेन यांच्या पक्षात परतण्याच्या बातम्या समोर Champai Soren ।
भाजप नेते चंपाई सोरेन यांच्या हेमंत सोरेन यांच्या पक्षात परतण्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यानंतर आता स्वतः सोरेन यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
फिर एक बार, कुछ न्यूज पोर्टलों द्वारा मेरे बारे में झूठी अफवाहें फैलाई जा रही हैं। एक साजिश के तहत, बार-बार ऐसा कर के समर्थकों में भ्रम पैदा करने तथा मुझे बदनाम की कोशिश की जाती है।
बहुत ही स्पष्ट शब्दों में बताना चाहूँगा कि मैं जहाँ हूँ, भविष्य में भी वहीं रहूँगा। किसी भी…
— Champai Soren (@ChampaiSoren) December 27, 2024
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “पुन्हा एकदा काही न्यूज पोर्टल्सद्वारे माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. एका षड्यंत्राचा एक भाग म्हणून माझ्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि पुन्हा पुन्हा असे करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” असे म्हटले आहे.
मला बदनाम कारण्यासच प्रयत्न Champai Soren ।
चंपाई सोरेन यांनी पुढे आपल्या पोस्टमध्ये, “मी तुम्हाला अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की मी जिथे आहे, मी भविष्यातही तिथेच राहीन. कोणत्याही परिस्थितीत त्या पक्षात परतण्याचा माझा कोणताही विचार नाही.” असे स्पष्ट केले आहे. पुन्हा एकदा काही न्यूज पोर्टलद्वारे माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. कटाचा एक भाग म्हणून माझ्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. असे त्यांनी म्हटले आहे.





