“नशिबात जे काम आलं त्यात…”: कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधलं लक्ष

Kushal Badrike | अभिनेता कुशल बद्रिकेला ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. विनोदीच्या अनोख्या शैलीमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही यातील सर्व कलाकारांना भरभरून प्रेम मिळते.
कुशल बद्रिके हा त्याच्या अभिनयासह सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच त्याने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
कुशल बद्रिकेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर मजेशीर पोस्ट शेअर करत लिहिले की, “मिशी…. पहिली प्रेयसी, पहिली नोकरी, पहिलं घर जसं विसरता येत नाही तसंच पहिल्यांदा काढलेली मिशी सुद्धा विसरता येत नाही. मी पहिल्यांदा मिशी काढली तेव्हां इयत्ता १०वी मध्ये होतो, जवळ जवळ आठवडा भर आरसा सुद्धा अनोळखी माणसा सारखा बघायचा माझ्या कडे. शाळेत, क्लास मध्ये रुमाल धरून कितीतरी दिवस फिरलो होतो मी.” Kushal Badrike |
View this post on Instagram
पुढे त्याने लिहिले की, “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शहीद भगतसिंग ह्यांच्या थोर कामासोबत त्यांच्या मिश्या सुद्धा मला तेवढ्याच लक्षात राहिल्या. “मुछे हो तो नथ्थूलाल जैसी” हे बालपणी ऐकलेलं वाक्य पुढे आयुष्यभर का लक्षात राहिलं कुणाचं ठाऊक. नंतर नशिबात जे काम आलं त्यात बहुतेकदा दाढी मिशी काढावीच लागली चार्ली चॅप्लिनची मिशी कधी माझ्या ओठांवर चिकटली नाही पण त्याचं लोकांना हसवण्याचं काम मात्र माझ्या नशिबाला अगदी घट्ट चिकटलं.फक्त एका गोष्टीचं उत्तर मला आजतागायत सापडलं नाही की मिशीला कोणतीही चव नसताना, काही लोक दातांना “उसाचं गुऱ्हाळ” करून त्या मिश्या “उसा” सारख्या चावत का बसतात?” कुशलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Kushal Badrike |
अनेकदा कुशल पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना दिसतो. सध्या कुशलने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. Kushal Badrike |
हेही वाचा:
‘हा देश एखाद्याच्या इच्छेनुसार चालवला…’ ; वक्फ दुरुस्ती विधेयकावर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान





