‘मॅडनेस मचायेंगे’ घेणार प्रेक्षकांचा निरोप; कुशल बद्रिकेने शेअर केली खास पोस्ट

Kushal Badrike | झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तरी यातील कलाकरांनी स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यातील अभिनेता कुशल बद्रिके या शोनंतर सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. मात्र आता हा शो देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यापूर्वी त्याने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
कुशल बद्रिकेने ‘मॅडनेस मचायेंगे’ मधील प्रवासाचा अनुभव सांगितला आहे. त्याने लिहिले की, “हिंदी म्हणजे आयुष्यात आलेली सगळ्यात मोठ्ठी संधी” असं काही मला वाटत नाही ! पण माझा “अमोल पणशीकर” नावाचा मित्र मला कायम म्हणतो, “स्वतःच कॅनव्हास मोठं कर म्हणजे चित्र काढायला मजा येईल आणि ते रंगवायलाही !” म्हटलं एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.”
View this post on Instagram
कुशलने पुढे लिहिले की, “मला खरच मजा आली, खूप वेगळा आणि खूप चांगला अनुभव आला. नवीन मित्र मिळाले, नवीन शिकायला मिळालं. आज आणि उद्या ह्या हिंदी कार्यक्रमाचे शेवटचे भाग टेलिकास्ट होत आहेत नक्की बघा “मॅडनेस मजायेंगे” सोनी हिंदीवर. आणि एक गोष्ट अनुभवली, आयुष्याला रंगत येण्यासाठी अख्खं आभाळ रंगवायची गरज नाही, माणसाला स्वतःपुरतं इंद्रधनुष्य होता आलं, की पुरेसं होतं. (सुकून)”. यासोबतच त्याने या शोमधील कलाकारांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
दरम्यान, ‘मॅडनेस मचायेंगे’ हा शो मार्च २०२४ पासून सुरू झाला. प्रेक्षकांकडून दिलासादायक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे निर्मात्यांना बंद करण्याचा निर्णय घेतला. कुशलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ‘जत्रा ‘पांडू हवालदार’, ‘बाप माणूस’, ‘स्लॅम बूक’ या सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.
हेही वाचा:
तुकोबांचा पालखी सोहळा काटेवाडीत; अजित पवारांकडून पालखीचं ”सारथ्य” तर सुप्रिया सुळेंकडून ”स्वागत”





