Chagan Bhujbal on Nabhik Samaj – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यावरून राज्यामध्ये सध्या मोठा वाद सुरु आहे. शिंदे – फडणवीस – पवार सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केली आहे. मात्र आपल्याच सरकारच्या निर्णयाला मंत्री छगन भुजबळ कडाडून विरोध करत आहेत.
अहमदनगर येथे शनिवारी ओबीसी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. येथे छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका मांडली. भुजबळ यांनी यावेळी बोलताना नाभिक समाजाला केलेलं आवाहन वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
अशातच भुजबळ यांनी आपल्या वक्तव्याबाबत आज स्पष्टीकरण दिले आहे. आपण नाभिक समाजाला केलेलं आवाहन एका गावासाठी होतं, असं भुजबळ यांनी म्हंटलंय.
काय म्हणाले होते भुजबळ? | Chagan Bhujbal on Nabhik Samaj
छगन भुजबळ यांनी अहमदनगरच्या सभेत बोलताना, एका नाभिक समाजाच्या मुलाने ओबीसी मोर्चाला पाठिंबा दिल्याने त्या गावातील मराठा समाजाकडून त्याच्या दुकानावर बहिष्कार टाकल्याचा दावा केला होता. नाभिक समाजाने मराठा समाजाच्या ‘हजामती’ करू नयेत असं जाहीर आवाहन भुजबळ यांनी केलं होत.
भुजबळ यांच्या वक्तव्यावरून गदारोळ । Manoj Jarange on Chagan Bhujbal
भुजबळ यांच्या या वक्तव्यावरून राज्यभरात नव्या वादाची ठिणगी पडली होती. काही ठिकाणच्या नाभिक समाजाकडूनही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत भाष्य करताना भुजबळ हे ओबीसी समाजाला लागलेले डाग आहेत असं वक्तव्य केलं होत.
भुजबळ यांचे स्पष्टीकरण | Chagan Bhujbal on Nabhik Samaj
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या छगन भुजबल यांनी आज याबाबत भाष्य केलं. आपण केलेलं वक्तव्य एका गावापुरते मर्यादित असल्याचे ते म्हणाले. नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या दुकानावर बहिष्कार टाकण्यात आल्याची घटना आपल्याला मेसेजद्वारे समजल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या