Vijay Wadettiwar राज्यात नुकतेच घडलेल्या आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुन्हेगारीवर चर्चा होऊ लागली आहे. अशात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने त्यांना शुभेच्छा दिल्या.
निवडणुकांआधी महायुतीत गुंडांची भरती जोरात! निवडणुकीपूर्वी सत्तेतील तीनही पक्षात स्वतःची गैंग मजबूत करण्यासाठी जबरदस्त स्पर्धा.
👉मुख्यमंत्री पुत्राची वर्षा बंगल्यावर हेमंत दाभेकरशी भेट.
👉मुख्यमंत्र्यांची निलेश घायवाळ सोबत भेट.
👉 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधे… pic.twitter.com/w5kJdTRIKV— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 6, 2024
यावेळी फोटो अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी शेअर केला असून या फोटोवरून चर्चांना उधाण आले. अशात अजित पवार यांची पुण्यातील गुन्हेगार असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतली. सोमवारी या दोन घटना उघड झाल्यानंतर मंगळवारी संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला. यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर टीका केली आहे.
गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे.
राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर… pic.twitter.com/vjih1SkiFW
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 6, 2024
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी दोन दिवसांतील घडामोडींचे फोटो ट्विट केले आहे. सोबत कॅप्शनमध्ये महायुतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकांआधी महायुतीत गुंडांची भरती जोरात! निवडणुकीपूर्वी सत्तेतील तीनही पक्षात स्वतःची गँग मजबूत करण्यासाठी जबरदस्त स्पर्धा करत आहेत.
– मुख्यमंत्री पुत्राची वर्षा बंगल्यावर हेमंत दाभेकरशी भेट.
– मुख्यमंत्र्यांची निलेश घायवाळ सोबत भेट.
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीशी भेट
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची गजा मारणेशी घरी जाऊन भेट.
गुंडांचे आदरतिथ्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून जनतेने कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा कशी करावी? अशी जहरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.