Bharat Gogawale: रायगडला पालकमंत्री मिळाल्याने जल्लोष; भरत गोगावले यांच्या नियुक्तीचे पेढे वाटून स्वागत
Bharat Gogawale: गोगावले यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

खालापूर – गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला. मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारकडून निर्णय जाहीर होताच खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत गोगावले यांच्या नियुक्तीचे स्वागत केले. त्यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये गेल्या काही काळापासून रस्सीखेच सुरू होती. भरत गोगावले हे या पदासाठी आग्रही होते. अखेर राज्य सरकारने रायगडची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
गोगावले यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या नेतृत्वाखाली खालापूर येथील जनसंपर्क कार्यालयासमोर तसेच खोपोली शहरातील मध्यवर्ती कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
खालापूरात युवासेना कर्जत-खालापूर विधानसभा अधिकारी रोहित विचारे, उपनगराध्यक्ष किशोर पवार, नगरसेवक हरेश मोडवे, किरण पाटील, सागर भुईकोट, ॲड. भगवान लाले, सुजित शिंदे, प्रफुल खोपकर, प्रवीण मुंडे, यश पाटील, निलेश दळवी, अमोल दरेकर, शेखर खोपकर, अक्षय काशीद आदी उपस्थित होते.
तर खोपोलीत नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, गटनेते संदीप पाटील, नगरसेवक दिनेश थोरवे, हरिश काळे, अमित फाळे, शहरप्रमुख तात्या रिठे, कार्याध्यक्ष अनिल मिडे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, संपर्कप्रमुख संदीप पाटील, युवानेते गणेश खानविलकर, महिला शहर संघटिका प्रिया जाधव, माजी नगरसेविका केविना गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.





