डीजे न लावता अनोख्या पद्धतीने साजरी केली शिवजयंती, महिला भगिनींना बक्षिसांची खास मेजवानी

विश्रांतवाडी – भैरवनगरमधील श्री गणेश मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डीजेच्या कर्णकर्कश आवाजात धांगडधिंगा न करता अनोख्या पद्धतीने साजरी केली. महाराजांची जयंती व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिला भगीनींसाठी सुप्रसिद्ध निवेदिका पूजा काळभोर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला. पैठणीचा या मनोरंजनात्मक व प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमातील विविध खेळात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन महिला भगिनींनी आनंद लुटला. अनोख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या आयोजनामुळे धानोरी, टिंगरेनगर, कळस, लोहगाव व विश्रांतवाडी परिसरात मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे. युवानेते विशाल टिंगरे व युवा उद्योजक अतुल टिंगरे यांच्या विशेष सहकार्यातून कार्यक्रम पार पडला.
“न्यू होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा” या कार्यक्रमातून खास मेजवानी मिळाल्याचा आनंद प्रत्येक महिला भगिनींच्या चेहऱ्यावर दिसत होता. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत महिलांनी आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान आयोजित स्पर्धेत सोनी साबळे या प्रथम क्रमांक पटकावत मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तसेच, भारती कांबळे यांनी द्वितीय क्रमांक तर भाग्यश्री मेठे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
कार्यक्रमप्रसंगी उपस्थित महिला भगिनींसाठी स्पेशल लकी ड्रॉ देखील काढण्यात आला. यामध्ये वनिता गुडीमनी व लक्ष्मी कसबे या विजेत्या ठरल्या. त्यांना अनुक्रमे सोन्याची नथ व चांदीचा छल्ला बक्षीस देण्यात आले. त्याचबरोबर ऑन द स्पॉट मध्ये देखील सुमारे २५ भगिनींनी बक्षीसे जिंकली. सुप्रसिद्ध निवेदिका पूजा काळभोर यांनी आपल्या सादरीकरणातून रंगत आणली. त्यामुळे उपस्थित महिला भगिनींचा उत्साह वाढला.
कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्यकर्ते विशाल टिंगरे, सचिन टिंगरे, विनोद पवार, शशिकांत टिंगरे, अतुल टिंगरे, शांताराम खलसे, विनोद वैरागर, अतुल परांडे यांनी उपस्थित राहून मंडळाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
मंडळाचे अध्यक्ष योगेश जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष रोकडे, विशाल रेड्डी, सुशील देटे, किरण देटे, गुरुनाथ बिराजदार, पांडुरंग भोसले, विश्वास देटे, हेमंत रेड्डी, आशिष जेकेल्लू, अरुण बिराजदार, लालू दाभाडे, आनंद सकपाळ, मयुर देटे,महेश मुडे, तसेच सर्व सभासद व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.





