शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करा – महाळुंगे पोलीस
Updated On:

महाळुंगे – करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन महाळुंगे पोलिसांकडून करण्यात आले आहे. मिरवणूक, बाईक रॅली, डीजे डॉल्बी यांवर बंदी असणार आहे. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्त यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नियमांचे पालन करून आरोग्य संदर्भातील उपक्रम राबवणे, एक गाव एक शिवजयंती, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, विविध स्पर्धा, आदी उपक्रम घेणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिवजयंतीदरम्यान, कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या.




