Kuruli Phata Accident : कुरुळी फाट्यावर काळाचा घाला! भरधाव टेम्पोच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी अंत
Kuruli Phata Accident : १० जानेवारीला घडलेल्या भीषण अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान अंत; कुरुळी परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
Updated On:

Kuruli Phata Accident – भरधाव वेगातील टेम्पोने पादचारी तरुणास धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १० जानेवारी २०२६ रोजी खेड तालुक्यातील कुरुळी फाटा येथे घडली.मधुकर सिताराम बोचरे (वय ३६, रा. दत्तनगर, चिंबळीगाव, ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तुकाराम मास्नी तांबडे (वय ४५, रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
नंदकिशोर बाळासाहेब तौर (वय ३०, रा. चिंबळी, ता. खेड) यांनी शनिवारी (दि. ३१) याबाबत दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टेम्पो चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून बोचरे यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहे.





