Kolkata: डॉक्टर तरुणीच्या हत्या प्रकरणाची CBI चौकशी होणार; उच्च न्यायालयाचे आदेश

Kolkata Doctor Murder Case | कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. अनेक ठिकाणी याप्रकरणानंतर आंदोलन करण्यात आली. डॉक्टरांची संघटना FORDA ने सोमवारी डॉक्टरांचा देशव्यापी संप जाहीर केला होता. याप्रकरणी मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत डॉक्टर तरुणी बलात्कार आणि हत्येप्रकरणातील सर्व दस्ताऐवज सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी शनिवारी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान, रुग्णालय प्रशासनाने हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले, त्यावर उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली. रुग्णालय प्रशासनाच्या अनेक त्रुटी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. Kolkata Doctor Murder Case |
प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या पालकांची उच्च न्यायालयात धाव
प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली होती. याशिवाय. सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या इतर अनेक जनहित याचिका (पीआयएल) ही दाखल करण्यात आल्या होत्या. Kolkata Doctor Murder Case |
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) शिष्टमंडळाची भेट घेतली. IMA ने गुन्ह्याला कारणीभूत असलेल्या परिस्थितीचा सखोल तपास करण्याची आणि कामाच्या ठिकाणी डॉक्टरांची, विशेषत: महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. Kolkata Doctor Murder Case |
आरोपीचा शोध कसा लागला?
शुक्रवारी सकाळी आरजी कर हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणीची हत्या करण्यात आली त्याठिकाणी पोलिसांना एक हेडफोन आढळला. तो हेडफोन आरोपीच्या मोबाईलशी कनेक्ट झाला त्याशिवाय पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन तपास केला. तेव्हा आरोपीच्या बुटावर रक्ताचे डाग आढळले. त्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा:





