अरुणाचल प्रदेशमध्ये अनोखी तिरंगा रॅली पाहून PM मोदींनी व्यक्त केला आनंद; म्हणाले “देशभक्ती प्रत्येक…”

Arunachal Pradesh ‘Har Ghar Triranga’ | अरुणाचल प्रदेशमध्ये ‘हर घर तिरंगा मोहिमे’अंतर्गत अनोख्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अरुणाचलच्या पूर्व केमांग येथील सेप्पा येथे ६०० फूट लांबीची तिरंगा मिरवणूक काढण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या रॅलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे.
अरुणाचल प्रदेशच्या अनोख्या तिरंगा रॅलीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. “अरुणाचल प्रदेश अशी भूमी आहे जिथे देशभक्ती प्रत्येक नागरिकाच्या हृदयात खोलवर रुजलेली आहे. हे राज्याच्या चैतन्यशील सांस्कृतिक वारशात स्पष्टपणे दिसून येते. #HarGharTiranga बद्दल इतका उत्साह पाहून आनंद झाला”, असे मोदींनी म्हंटले आहे. Arunachal Pradesh ‘Har Ghar Triranga’ |
Arunachal Pradesh is a land where patriotism is deeply rooted in the heart of every citizen. This clearly reflects in the state’s vibrant cultural heritage. Glad to see such enthusiasm towards #HarGharTiranga. https://t.co/seqVK2Cf9H
— Narendra Modi (@narendramodi) August 13, 2024
मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी शेअर केला व्हिडिओ
मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी X वर या यात्रेची ५४ सेकंदाची व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, “हमारी शान तिरंगा ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत सेप्पा, पूर्व कामेंग येथे भव्य ६०० फूट लांबीचा तिरंगा हाती घेत यात्रा आयोजित करण्यात आली होती. तिरंगा यात्रेत राज्याचे गृहमंत्री मामा नाटुंग यांच्यासह आमदार इलिंग तालांग आणि हायंग मांगफी, पूर्व कामंग उपायुक्त सचिन राणा, एसपी कामदम सिकोम, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, शाळकरी मुले आणि इतरांनी सहभाग घेतला होता.”
विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
दरम्यान, शहराच्या रस्त्यांवरून भव्य तिरंगा नेत असताना, विद्यार्थ्यांसह सहभागींनी “वंदे मातरम्” चा नारा दिला. यावेळी नागरिकांच्या मनात ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवानिमित्त स्वातंत्र्य, देशभक्ती आणि राष्ट्रवादाची भावना भरलेली होती. Arunachal Pradesh ‘Har Ghar Triranga’ |
दरम्यान, केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियान कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी देशवासियांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
हेही वाचा:





