Cash For Query Issue: महुआ मोइत्रा म्हणाल्या, ‘सीबीआय तपासासाठीदेखील मी तयार…’,

Cash For Query Issue : संसदेत प्रश्न विचारण्याच्या मोबदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याच्या आरोपावरून तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. त्यातच लोकसभेच्या आचार समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांचे प्रतिज्ञापत्र त्यांना मिळाले असल्याचे म्हटले आहे तर त्याला उत्तर देताना महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी पलटवार करत मला गप्प करण्याचा भाजपचा अजेंडा असल्याचे म्हटले आहे.
महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत,” “आचार समितीचे अध्यक्ष माध्यमांशी बोलत आहेत. कृपया लोकसभेचे नियम पहा. प्रतिज्ञापत्र मीडियापर्यंत कसे पोहोचले? ते कसे लीक झाले याची चौकशी अध्यक्षांनी करावी. मी पुन्हा सांगते की भाजपचा हा अजेंडा आहे अदानी प्रकरणी माझे तोंड बंद आहे. त्यासाठी त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सांगितले,”अदानी-दिग्दर्शित मीडिया सर्कस ट्रायल किंवा भाजपच्या ट्रोल्सला उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ किंवा रस नाही. ””मी नादियामध्ये दुर्गापूजा साजरी करत आहे. शुभो षष्ठी.
पुढे बोलताना त्यांनी(Mahua Moitra) , “तीन दिवसांपूर्वी (16 ऑक्टोबर 2023), हिरानंदानी ग्रुपने अधिकृत प्रेस रिलीजमध्ये म्हटले होते की त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत. आज (19 ऑक्टोबर 2023) पत्रकारांना कबुलीजबाब देणारे प्रतिज्ञापत्र लीक झाले. “हे प्रतिज्ञापत्र पांढर्या कागदाच्या तुकड्यावर आहे, त्याचे कोणतेही लेटरहेड नाही आणि माध्यमांना लीक झाल्याशिवाय अधिकृतपणे प्रसिद्ध केले गेले नाही.” तसेच “पीएमओने दर्शन आणि त्यांच्या वडिलांकडे बंदूक दाखवली आणि त्यांना पाठवलेल्या पत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांना 20 मिनिटे देण्यात आली. त्यांचे सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची धमकी देण्यात आली. त्याचे वडील रिअल इस्टेट व्यवसायात आहेत, जो सरकारच्या परवान्यावर अवलंबून आहे. असा गंभीर आरोप त्यांनी (Mahua Moitra) यावेळी केला.
दरम्यान,लोकसभेच्या आचार समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर म्हणाले, “माझ्या कार्यालयातून मला शुक्रवारी (20 ऑक्टोबर) हिरानंदानी यांचे दोन पानी पत्र आल्याची माहिती मिळाली. 26 तारखेला मी आचार समितीची बैठक बोलावली आहे, त्यात खासदार निशिकांत दुबे आणि वकील यांना बोलावले आहे..” सोनकर म्हणाले, “निशिकांत दुबे हे समितीसमोर येऊन त्यांचे म्हणणे नोंदवतील आणि त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते समितीला देतील. या सर्व पुराव्याची दखल घेऊन समिती चौकशी करेल.” असे म्हटले आहे.




