“निवडणुका रद्द करणं चुकीचं, निवडणूक आयोग कोणाचा सल्ला घेतयं?”; फडणविसांकडून पहिल्यांदाच विरोधाची भूमिका

Devendra Fadnavis | नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जाहीर प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता होणार आहे. मात्र मतदानाच्या काही तास आधी निवडणूक आयोगाने काही ठिकाणी निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला. कायदेशीर मुद्द्यांमुळे पेच निर्माण झाल्याने निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे.
माध्यमांसोबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही निवडणुका अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. उद्या मतदान आणि काल निवडणुका रद्द झाल्या. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीच आहे. अशा पद्धतीने कोणीतरी कोर्टात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलली जाईल असं आजपर्यंत कधी झालं नव्हतं. निवडणूक आयोग कुठला कायदा काढतय, कोणाचा सल्ला घेतय मला माहित नाही. जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी बोललो, अशा पद्धतीने निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून पुढे ढकलता येत नाहीत.” Devendra Fadnavis |
View this post on Instagram
“मी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी बोललो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. कोणा एकाचा फॉर्म रद्द झाला, तो कोर्टात गेला. कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला. ज्यांनी फॉर्म भरला त्यांना प्रचाराला पूर्ण वेळ मिळाला. कोणातरी पार्टी केलं होतं, म्हणून निवडणूक पुढे ढकलणं चुकीचं आहे. अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे. निवडणूक घेण्याचा त्यांना अधिकार आहे. कायदेशीररित्या निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण चुकीचं आहे. ज्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे गोष्टी केल्या. ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्यांच्यासाठी हे अत्यंत चुकीच आहे. आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाला एक रिप्रेझेंटेशन देऊ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis |
दरम्यान, राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकापुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहे. ज्या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथं आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळत पार पडणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून जिथं प्रचाराचा धुरळा उडत होता. तिथं अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलं आहे. Devendra Fadnavis |
हेही वाचा:





