Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे एमजीएम विद्यापीठात आयोजित सेंट्रल झोन युवा महोत्सव कार्यक्रमात त्यांनी सामाजिक आणि राजकीय विषयावर रोखठोक भाष्य केले आहे. तरुणांना आवाहन करत नाना पाटेकर म्हणाले की, “सध्या आपल्या अवतीभोवती जे सामाजिक आणि राजकीय घडत आहे, ते पाहून घुसमट होत असल्याचं जाणवतं. अभिनयातून याबद्दल आपण व्यक्त होऊ शकतो. मी प्रहार सिनेमावेळी तीन वर्षे सीमेवर राहिलो, तरुण मुलं सीमेवर निधड्या छातीने उभी असतात, हातात AK-47 असते.” “आपल्या देशात सैनिकांचा सन्मान होत नाही याची खंत वाटते. ते आपल्यासाठी मरत आहेत, पण त्यांना जो सन्मान मिळायला हवा तो आमच्याकडून मिळत नाही. परदेशात सैनिक आल्यावर प्रेसिडेंट उभा राहून सॅल्युट करतो, पण आपल्याकडे तसं होत नाही,” असं नाना पाटेकर म्हणाले. जातीपातीच्या राजकारणाबाबत काय म्हणाले नाना पाटेकर? जातीपातीच्या राजकारणाबद्दलही नाना पाटेकर स्पष्टच बोलले. “राजकारणातील काही जण आपल्यात जातीपातीवरुन दरार टाकू इच्छित आहेत. तुम्हाला माहिती आहे ते कोण आहेत, कसे आहेत, त्यांना प्रत्युत्तर द्यायचं आहे. मतदान करताना त्यांना प्रत्युत्तर द्या. तुम्ही मुलं आहेत तुमच्याकडून मी आशा करतो, बदल आता तुम्ही आणणार. तुम्हाला सतर्क व्हायला पाहिजे. तरुणांनी विचार करून मतदान करायला हवं, गर्दीचा भाग होऊ नये. जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना मतदानातून उत्तर द्या,” असं आवाहन त्यांनी तरुणांना केलं. Nana Patekar | नाना पाटेकर हे प्रसिद्ध अभिनेते आहे. याशिवाय त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रचंड मोठं सामाजिक कार्य केलं आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यापासून ते दुष्काळजन्य परिस्थिती दूर करण्यासाठी ते आजही काम करतात. हेही वाचा: pune : अपक्ष उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप