Vitthal Temple | जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेसाठी मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. तसेच मंदिरातील कर्मचारी, सुरक्षारक्षक यांना ओळखपत्र देण्याच्या सूचना देण्यात आली आहे. याशिवाय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहलगाम घटनेनंतर पोलीस प्रशासनाने मंदिरातील सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनाही दिला इशारा मंदिरातील सर्व कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांनी समितीने दिलेले ओळखपत्र परिधान करण्याचे सक्तीचे केले आहे, अन्यथा कारवाईचा इशारा समितीने दिला आहे. कर्मचारी यांना मंदिरात प्रवेश करणे व बाहेर पडण्यासाठी फक्त ‘व्हिआयपी गेट’चा वापर करण्यात येणार असल्याचे श्रोत्री यांनी सांगितले. Vitthal Temple | दरम्यान, मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी असून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या शिवाय मंदिर समितीच्या वतीने अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी केली जाते. तसेच खासगी सुरक्षा यंत्रणा देखील कार्यरत आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर समितीमार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. Vitthal Temple | हेही वाचा: गेंड्यांची कातडी घेऊन बैठकीला बसता का?; उपमुख्यमंत्री पवारांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी