Pimpri : एका साध्या वाटणाऱ्या घटनेने किती गंभीर वळण घेऊ शकते, याचे हृदय पिळवटून टाकणारे उदाहरण जाधववाडी, चिखली येथे समोर आले आहे. वडिलांनी मोबाइल तपासल्याच्या मानसिक धक्क्यातून १६ वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रतीक्षा अनिल गायकवाड (वय १६, रा. जाधववाडी, चिखली) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती महापालिकेच्या जाधववाडी, चिखली येथील शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. तिच्या जाण्याने कुटुंबासह मित्रपरिवार आणि शिक्षकवर्ग हादरून गेला आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १७) प्रतीक्षाचे वडील अनिल गायकवाड यांनी तिचा मोबाइल अचानक तपासला. त्यांनी याबाबत कोणतीही विचारणा किंवा राग व्यक्त केला नव्हता. मात्र, वडिलांनी मोबाइल तपासल्याची बाब मनाला लावून घेत प्रतीक्षा नैराश्यात गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. Nora Fatehi: नोरा फतेही अडचणीत; वर्क परमिट रद्द करून देशाबाहेर पाठवण्याची मागणी! त्याच रात्री सुमारे नऊ वाजताच्या सुमारास तिने घरातच विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवस उपचार सुरू होते, मात्र शनिवारी (दि. २१) रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून, पालकांनी मुलांशी संवाद वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. “मुलांना समजून घेणे आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे अत्यंत गरजेचे आहे,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. ही घटना केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण समाजाला विचार करण्यास भाग पाडणारी ठरली आहे. हेही वाचा: BJP on Abdul Basit: “ते जिवंत राहतील तरच…” ; अब्दुल बासित यांच्या दिल्ली-मुंबईवरील हल्ल्याच्या विधानावर भारताचे सडेतोड उत्तर