#BWFWorldTour : पी.व्ही. सिंधूने केला शेवट ‘गोड’

ग्वाँझू : भारताच्या पी.व्ही. सिंधूने बीडब्लूएफ टूर फायनल बॅडमिंटन स्पर्धेत गटातील अखेरच्या लढतीत विजय मिळवत स्पर्धेचा शेवट गोड केला, मात्र या आधीच्या दोन्ही लढतीत सिंधूला पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे शेवटच्या लढतीत विजयानंतरही यापूर्वीच गतविजेत्या सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानं तिला स्पर्धेचा निरोप घ्यावा लागणार आहे.
Badminton: India's PV Sindhu recorded a consolation win over China's He Bing Jiao in the third Group A match to end her campaign on a positive note at the year-ending BWF World Tour Finals #BWFWorldTourFinals2019 pic.twitter.com/gizbiLdFCd
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 14, 2019
सिंधूने शुक्रवारी चीनच्या हे बिंग जिओवर २१-१९, २१-१९ असा विजय मिळवला. ही लढत ४२ मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत सिंधू सहाव्या तर बिंग जिओ सातव्या स्थानी आहे.
दरम्यान, स्पर्धेत याआधी पहिल्या लढतीत जापानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा १८-२१, २१-१८, २१-८ असा तर दुस-या लढतीत चीनच्या चेन यु फेइने सिंधूचा २०-२२, २१-१६, २१-१२ असा पराभव केला होता.





