BWF World Badminton Championships : पीव्ही सिंधूची विजयी सलामी; आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा केला पराभव
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हीने सोमवारी बीडब्ल्युएफ जागतिक बॅडमिंटनच्या (BWF World Badminton Championships) मोहिमेची थाटात सुरुवात केली.

BWF World Badminton Championships : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हीने सोमवारी बीडब्ल्युएफ जागतिक बॅडमिंटनच्या (BWF World Badminton Championships) मोहिमेची थाटात सुरुवात केली. तीने पहिल्या फेरीच्या लढतीत आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा पराभव करत विजयी सलामी दिली.
सिंधूने पहिली गेम २१-७ अशी सहज जिंकत आपले वर्चस्व (BWF World Badminton Championships) प्रस्थापित केले. या गेममध्ये तीने सोफियाला फारशी संधीच दिली नाही. सिंधूने क्रॉसकोर्टचे असे काही फटके मारले की सोफियाची चांगलीच दमछाक झाली. तिला सिंधूच्या सर्व्हिसचे उत्तरच देता येत नव्हते.
दुसरी गेम सुरु झाल्यावर सोफियाला काहीसास सुर गवसला होत. तीने लढत देण्याचा प्रयत्नही केला. एकवेळ स्कोअर १०-६ असेही रंगला होता. मात्र, त्यानंतर सिंधूने पुन्हा एकदा आपला अनुबव पणाला लावला व आघाडी आणखी वाढवली. सोफियानेही चांगली लढत देत १८-११ अशी जिद्दी खेळी केली. मात्र, त्यानंतर सिंधूने तीला पुन्हा संधी दिली नाही व ही गोम २१-११ अशी जिंकत सामनाही खिशात टाकला.
जागतिक स्पर्धेच्या इतिहासात सिंधूने आतापर्यंत (BWF World Badminton Championships) पाच पके पटकावलेली असून आपल्या सहाव्या पदकाच्या शर्यतीत तीने सुरुवात चांगली केली आहे. २००९ साली हैदराबादला ही स्पर्धा झाली होती, त्यानंतर तब्बल १७ वर्षांनंतर बारताला या स्पर्धेचे परत एकदा यजमानपद मिळाले आहे.
दोनवेळची ऑलिम्पिक पदक विजेती असलेली सिंधू यंदा विजेतेपदाची प्रमुख दावेदार मानली जात असून पहिल्या फेरीच्या सामन्यात तरी तीने आपला नेहमीचाच आक्रमक खेळ दाखवला आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभही तिला होणार असून चाहत्यांचाही स्पर्धेला मोठ्या प्रमाणात पाठींबा असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले.






